Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर
Trending

अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ' नवनाथ माने' समोर पुणे महानगरपालिका 'नतमस्तक'

पुणे Tak– १४ मार्च २०२६

पुणेTak: प्रतिनिधी
फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या अभियंता अमोल पुंडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात नवनाथ महादेव माने (धनाजी बिल्डर) यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ४३ व ५२ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला. एप्रिल २०२५ मध्ये बिल्डरला अटक झाली, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आणि BNS कलम १२५, ३५१, ३१८(४) अंतर्गत अतिरिक्त आरोप दाखल झाले.

 

पण आज १४ मार्च २०२६ — म्हणजे पूर्ण एक वर्ष उलटल्यानंतरही कोंढव्यातील त्याच्या ७ ठिकाणी बेकायदेशीर इमारती पूर्णत्वाकडे जात आहेत! PMC ने फक्त ‘नावासाठी’ कारवाई केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

७ ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे (फिर्यादीत नमूद):

  • सर्वे नं. ५१ भाग्योदय नगर (अल्फलाह मस्जिद शेजारी)
  • सर्वे नं. ४६ मलिक नगर
  • सर्वे नं. ५१ शिवनेरी
  • सर्वे नं. ५० भाग्योदय नगर (माजी नगरसेविका परवीन शेख कार्यालयासमोर)सर्वे नं. ४८ साईबाबा नगर
  • सर्वे नं. ५१/२ ब मिठानगर
  • सर्वे नं. ४९ कोंढवा खुर्द

विशेषतः सर्वे नं. ५५ भाग्योदय नगर (हाजरा पॅलेस / लबेक मेडिकल शेजारी) येथे PMC ने कारवाई केली होती, पण बिल्डर नवनाथ माने यांनी लगेच पुन्हा काम सुरू केले. स्थानिक अ‍ॅक्टिव्हिस्ट म्हणतात,
“अटक झाली, FIR झाला, पण बिल्डर बिंदास काम करतो आहे. PMC फक्त रिपोर्ट लिहिते आणि शांत बसते. इमारत कोसळली तर जबाबदारी कोण घेणार?”

२०२५-२६ मध्ये PMC ने कोंढवा खुर्द-बुद्रुक भागात हजारो चौरस फूट बेकायदेशीर बांधकामे तोडली, पण नवनाथ माने यांच्या या ७ साइट्सवर स्थायी थांबा किंवा पूर्ण डेमोलिशन झाल्याचे कोणतेही अपडेट नाही. उलट, काम वेगाने चालू असल्याचे स्थानिकांचे फोटो-व्हिडिओ पुरावे आहेत.

कोंढव्यातील नागरिकांचा संताप आणि मागणी:
“PMC कमिशनर, सिटी इंजिनियर जागे व्हा! फक्त FIR आणि अटक पुरेशी नाही. आता तात्काळ डेमोलिशन ड्राईव्ह सुरू करा. बिल्डरवर नवीन गुन्हे दाखल करा आणि सगळे  ७ ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे इमारत तात्काळ तोडा!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!