Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर
Trending

अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ' नवनाथ माने' समोर पुणे महानगरपालिका 'नतमस्तक'

✅ पुणे टक – ब्रेकिंग न्यूज | ३० मार्च २०२६

कोंढवा, पुणे – पुणे टकने १४  मार्च २०२६ रोजी “एक वर्ष उलटले… PMC अजूनही झोपेत?” या स्फोटक रिपोर्टनंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने अखेर नवनाथ महादेव माने यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर पहिली ठोस कारवाई केली आहे.

PMC च्या झोन-२ च्या ज्युनियर इंजिनियर अमोल पुंडे यांनी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या FIR क्र. ०१०७/२०२५ (MRTP कलम ४३ व ५२) नंतर आज (३० मार्च २०२६) कोंढवा खुर्द येथील नवनाथ माने यांच्या एक अनधिकृत इमारतीवर डिमोलिशन कारवाई सुरू झाली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

नवनाथ माने यांनी केवळ एक वर्षात ८ ते १० बेकायदेशीर बहुमजली बांधकामे उभी केली आहेत.

PMC ने आता या प्रकरणात MRTP Act अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

मात्र ७ पैकी फक्त १ इमारतीवर कारवाई झाली असून बाकी ६ ठिकाणी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.

नागरिकांचा प्रश्न:

“फक्त एका इमारतीवर कारवाई करून PMC काय सिद्ध करत आहे? नवनाथ माने यांनी २०२४-२५ या दोन वर्षांत एकट्याने ८ ते १० अनधिकृत इमारती उभ्या केल्या. आता PMC वर्कशॉप ऑर्डर आणि MRTP Act अंतर्गत गुन्हा दाखल करणार का? की पुन्हा डोळेझाक सुरू होणार?”

पुणे टक चा पाठपुरावा

पुणे टकने दिवाळीच्या मुहूर्तावर कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता लाटला जाणार असल्याचे उघडकीस आणल्यानंतर सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अधिकारी “मिस्टर इंडिया” सारखे गायब झाले होते, तरी पुणे टकने सतत दबाव टाकला. त्यामुळे आज अखेर PMC ला पहिली कारवाई करावी लागली आहे.

पुणे टक प्रतिनिधी | कोंढवा

३० मार्च २०२६

७ बेकायदेशीर ठिकाणे (FIR मध्ये नमूद):

सर्वे नं. ५१, भाग्योदय नगर (अल-फलाह मस्जिद जवळ)

सर्वे नं. ४६, मलिक नगर

सर्वे नं. ५१, शिवनेरी नगर

सर्वे नं. ५०, भाग्योदय नगर

सर्वे नं. ४८, साईबाबा नगर

सर्वे नं. ५१/२बी, मक्का मस्जिद

सर्वे नं. ४९, मीठा नगर

पुणे टक च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही पहिली कारवाई झाली आहे. बाकी ६ इमारतींवर कधी कारवाई होणार? पुणे टक सतत नजर ठेवून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!