Pune Exclusive: 5 हजार मताला, 100 कोटींची उधळण, 25 दुचाकी अन् परदेशी प्रवास, प्रभागातलं खर्चाचं गणित
पुणे:
राहुल कुल
महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाईल. अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप ही झाले आहेत. शिवाय वेगवेगळी प्रलोभने मतदारांनी दिल्याचे ही समोर आले होते. त्यात आता एका प्रभागात निवडणुक लढवण्यासाठी किती खर्च येतो. कोण कोणते प्रकार करावे लागत आहेत त्याचं गणित समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख नमेश बाबर यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात कशा पद्धतीने खर्च केला जात आहे याचा हिशोबच मांडला आहे. हा हिशोब पाहीला तर तुम्ही डोक्याला हात मारल्या शिवाय राहाणार नाही.
पुणे महापालिकेतील 38 क्रमांकाचा प्रभाग हा सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागातून एकूण 5 नगरसेवक निवडून येतात. याच प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख नमेश बाबर यांचा मुलगा निवडणूक लढवत आहेत. यांच्याच कार्यालयाची निवडणूक आयोगाने झाडाझडती घेतली. पोलीस ही येवून गेले. पैसे वाटप चाललं आहे असा त्यांना संशय होता. त्यामुळे पोलीस आले. निवडणूक आयोगाचे लोक ही आले. त्याने सर्व चेक केलं. इन कॅमेरा चेक केले. पण त्यांना काही सापडलं नाही. आम्हाला बिझी करण्याचं काम विरोधकांनी केलं असा आरोप बाबर यांनी या निमित्ताने केला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. त्यामुळे पैसे वाटण्याचा प्रश्नच नाही असं ही ते म्हणाले.



