Pune School Holiday: शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी महत्वाची सूचना…! पुणे शहरातील शाळा शुक्रवारी बंद
Pune School Holiday: पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली

पुणे Tak :पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन उद्या दिनांक २३ जानेवारी २०२६ (शुक्रवारी) शहरात करण्यात आले असून या स्पर्धेमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.ही सायकल शर्यत पिंपरी-चिंचवड येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून सुरू होणार असून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बालगंधर्व रंगमंदिर येथे तिचा समारोप होणार आहे. सुमारे ९५ किलोमीटर अंतराच्या या शर्यतीसाठी एकूण ५८ किलोमीटरच्या मार्गावर वाहतुकीत बदल लागू करण्यात आले आहेत.स्पर्धेच्या मार्गावर कोणतेही वाहन उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच प्रेक्षकांनी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बॅरिकेड्स आणि स्टॉपलाईनच्या मागेच उभे राहून शर्यतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.दरम्यान, या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.




