Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर
Trending

33 वर्षांचा प्रशासकीय झंझावात संपला! पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त; शेकडो अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप

पुणे : पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता (बांधकाम विकास) प्रशांत वाघमारे हे तब्बल 33वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रभावी सेवेनंतर आज (1 फेब्रुवारी 2026) अधिकृतपणे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवामुक्तीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांच्या मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. अनेकांनी “प्रशासनाचा कणा निवृत्त झाला” अशा भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

प्रशांत वाघमारे हे कडक शिस्त, निर्णयक्षमता आणि प्रशासकीय वचक यासाठी ओळखले जाणारे अधिकारी होते. प्रशासनात त्यांचा दबदबा इतका होता की नगरसेवकही त्यांना घाबरत असत. महापालिकेत असा वजनदार आणि प्रभावी अधिकारी पुन्हा येईल का? असा प्रश्न आज अनेकांच्या मनात उपस्थित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘गेमचेंजर’
वाघमारे यांनी महापालिकेत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बांधकाम, रस्ते, नगररचना आदी विभागांची कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू केली. यामुळे पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमता वाढली. त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे पुणे महापालिका ई-गव्हर्नन्समध्ये देशपातळीवर अग्रक्रमी राहिली. नदीकाठ सुधारणा, जायका प्रकल्प, शहर विकास आराखडा, बांधकाम नियमावली यासारख्या अनेक महत्त्वाच्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले.

  • विक्रमपूर्ण कारकीर्द
    1990: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुरुवात.
  • 1993: पुणे महापालिकेत उपअभियंता म्हणून रुजू.
  • सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण.
  • पथ विभागानंतर भवन रचना विभागात महत्त्वाची जबाबदारी.
  • विशेष म्हणजे, 22 वर्षांहून अधिक काळ शहर अभियंता पदावर कार्यरत राहण्याचा विक्रम.

सेवानिवृत्तीनंतरची व्यवस्था
वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर शहर अभियंता पदाची जबाबदारी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश काढले असून, पावसकर सोमवारपासून (2 फेब्रुवारी) कार्यभार स्वीकारतील.

निरोप समारंभ
सेवामुक्ती समारंभात शेकडो अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि भावुक होऊन निरोप दिला. “शहराच्या विकासासाठी अमूल्य योगदान” असे शब्द अनेकांनी वापरले.

पुणे शहराच्या विकासात प्रशांत वाघमारे यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाईल. त्यांच्या सेवानिवृत्तीने एका यशस्वी आणि प्रभावी कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!