Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
क्राईम
Trending

भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट – भाजप कार्यकर्त्याला अटक भिगवण येथील अपहरण प्रकरणात माजी सरपंच व भाजप कार्यकर्ता अझर शेख यांना दौंडमध्ये अटक. महसूल अधिकाऱ्यांवर मारहाण प्रकरणात नवे वळण.

Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा Pune Daund Azhar Sheikh Bhigwan Connection : पुण्यातील दौंडमधील माजी सरपंच अझर शेख याला पोलिसांनी अखेर अटक केली असून महसूल अधिकाऱ्याला मारहाण आणि इतर गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दौंडमध्ये फरार माजी सरपंच अझर शेख अटकेत

महसूल अधिकाऱ्याला मारहाणीचा गंभीर आरोप

भिगवण प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा

पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची तयारी

मंगेश कचरे, बारामती

पुण्याच्या दौंड मधून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेखला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. या आरोपीचा भिगवण प्रकरणात देखील हात असल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अझर शेख हा भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा चुलता आहे. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. दरम्यान तरुणीला पळवून नेण्यात अझर शेख याचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

अझर शेख यासोबत युवराज मेंगावडे याला देखिल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणात अझर शेख याने स्वामी चिंचोली गावाच्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.या गुन्ह्यात तो फरार होता,अखेर त्याला अटक करण्यात आली असून त्याला दौंड न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!