क्राईम
Trending
Pune Crime: भिगवण प्रकरणात चर्चेत असलेल्या अझर शेखचा ‘गेम ओव्हर’; पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना केली अटक
Pune Crime News: भिगवण प्रकरणातील आरोपींचा चुलता माजी सरपंच अझर शेख याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तलाठ्याला मारहाण केल्याप्रकरणी तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.

Pune Tak: पुणे ग्रामीण पोलिसांच्य़ा स्थानिक गुन्हे शाखेने आज (27 फेब्रुवारी) रोजी अझर शेखला अटक केली आहे. दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्ह्या दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. तो अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. याशिवाय गेला आठवडाभर भिगवण प्रकरण जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, त्यामधील आरोपी तरुण जहीर आणि आयान शेख यांचा तो नात्याने चुलता आहे. दरम्यान, अझर शेख हा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. यालाच अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची मागणी केली जात होती

