
पुणे Tak, २१ मार्च २०२६
पुण्यातील डॉ. प्रशांत नंदवटे यांना गुरुवारी (२० मार्च) संध्याकाळी सिंहगड किल्ल्यावर ‘बुधला माची’ जवळील ‘चिलमीचा खडा’ या खतरनाक ठिकाणी ३०० ते ३५० फूट खोल दरीत पडले. ट्रेकिंग करताना घसरल्यावर ते काही वेळाने शुद्धीवर आले आणि ११२ हेल्पलाइनवर फोन करून मदत मागितली.
हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने अंधारात २०-२५ मिनिटांत दोर आणि दिव्यांच्या साहाय्याने रेस्क्यू केले. डॉक्टरना फक्त किरकोळ जखमा झाल्या. टीम सदस्य तानाजी भोसले म्हणाले, “खडतर उतारावर ९० अंश कोनात उतरून त्यांना वाचवले.”
ट्रेकर्सना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे Tak



