
पुणे क्राईम ब्रँच युनिट-१ने इंटरस्टेट ‘टक-टक’ गँग उघडकीस आणली. मेरठ (यूपी) येथील रवी ओमप्रकाश कोहली (३८) आणि अफझल कय्यूम अब्बासी (३८) या दोघांना अटक.
ट्राफिक सिग्नलवर गाडीला ‘टक’ करून “तुमची गाडी कुणाला धडकली” किंवा “तेल गळत आहे” असा बहाणा करत ड्रायव्हरचे लक्ष वळवून समोरच्या सीटवरून मोबाइल, पर्स चोरण्याचे काम ते करत होते. करवे रोड, विमाननगर, कात्रजसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल. आरोपींना लॉजमधून पकडले.



