Welcome to Pune Tak
Click to listen highlighted text!
Welcome to Pune Tak

पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कथित २००० कोटी रुपयांच्या बेईशोबी मालमत्ता प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
Anti-Corruption Bureau (ACB) च्या खुल्या चौकशीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
सन २०१४-१६ मध्ये कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ACB ने प्राथमिक तपास केला होता. मात्र २९ एप्रिल २०१९ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी ही चौकशी नाकारली आणि प्रकरण बंद करण्यात आले.
२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करत स्पष्ट म्हटले —
“चौकशी रोखणे ही तपास प्रक्रियेत अडथळा आहे.”
ACB ला पुन्हा तपास सुरू करण्याचे निर्देश दिले.
त्याचबरोबर तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे.
Pune Tak चा सवाल:
हा प्रचंड घोटाळा PMC मध्ये कसा घडला? दोषी अधिकाऱ्यांना संरक्षण कोणी दिले? आता पूर्ण पारदर्शक तपास होऊन भ्रष्टाचार्यांना शिक्षा होईल का?
Pune Tak पुन्हा एकदा PMC च्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकत आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आता सुटका नाही!
न्याय होईल का? पुणे पाहत आहे…
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!