
आंदोलनातील प्रमुख मुद्दे व मागण्या: अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई: केवळ नोटीस न देता कायद्यानुसार अंतिम कारवाई करावी तसेच शहरभरातील इतर शाळांचीही व्यापक तपासणी करावी.
मान्यता व स्थलांतर तपासणी: इरादा पत्र किंवा प्रस्ताव सादर केलेल्या शाळांची कायदेशीर तपासणी करावी. तसेच कोंढवा परिसरातील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल व न्यू हॉरायझन स्कूलसह इतर स्थलांतरित शाळांच्या पूर्वपरवानगीची पडताळणी करावी.
विद्यार्थ्यांचे पुनर्वसन: कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश मिळवून द्यावा.
सुरक्षा व सुविधा: फायर सेफ्टी, इमारत व विद्युत सुरक्षा, स्वच्छता आणि शालेय वाहतूक-पार्किंग व्यवस्थेची पाहणी करावी.
पारदर्शकता व गुणवत्ता: शिक्षकांची पात्रता, शैक्षणिक दर्जा, RTE प्रवेश प्रक्रिया आणि अनधिकृत शाळांची अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात असलम इसाक बागवान, कबीर शेख, राजू सय्यद, सुफियान शेख आणि सचिन आल्हाट सहभागी झाले होते.
शिक्षण विभागाव्यतिरिक्त शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा शिक्षण संचालक आणि पुणे पोलीस आयुक्त यांनाही निवेदन सादर केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!