पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘एचसीएमटीआर’ (HCMTR) या उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे ३,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी तब्बल १,५०० कोटी रुपयांचा निधी पुणे महापालिकेच्या मुदत ठेवींमधून (FDs) वापरण्याचे नियोजन आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. या निधीच्या वापरामुळे शहरातील इतर विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला दिल्या आहेत.
‘एचसीएमटीआर’सह तळजाई ते हिंगणे, पाषाण ते पंचवटी बोगदे आणि इनर रिंगरोड या प्रकल्पांनाही गती दिली जाणार आहे. प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘डिजिटल डॅशबोर्ड’ आणि ‘वॉर रूम’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डिसेंबर २०२६ मध्ये ‘एचसीएमटीआर’ची निविदा काढण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी आवश्यक असलेल्या कॅन्टोन्मेंट, संरक्षण, रेल्वे आणि वन विभागाच्या परवानग्या मिळवण्यासाठी राज्य स्तरावरून विशेष बैठका घेतल्या जाणार आहेत.
खडकी ‘एचसीएमटीआर’साठी कॅन्टोन्मेंट, संरक्षण विभाग, रेल्वे आणि वन विभागाच्या जमिनी आवश्यक आहेत. या परवानग्या मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर बैठका घेतल्या जातील. बाधित झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे स्वतंत्र नियोजन करा. तळजाई आणि पंचवटी बोगद्यांसाठी पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करून जैवविविधतेला बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. डिसेंबर २०२६ मध्ये ‘एचसीएमटीआर’ची निविदा काढण्याचे उद्दिष्ट असून, प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड आणि वॉर रूम तयार करा, असे त्यांनी सांगितले.
#PuneLocal #PuneTraffic #HCMTR #PMC #PuneMunicipalCorporation #MadhuriMisa
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!