Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर
Trending

बेकायदा बांधकाम झाल्यास अभियंत्यांवर जबाबदारी !

पुणे शहरात, विशेषतः लोहगाव आणि विमाननगर भागात वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांवरून पुणे महानगरपालिका आक्रमक झाली आहे. यापुढे अनधिकृत बांधकामे झाल्यास कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

पुणे : शहरातील विविध भागांत होणाऱ्या बेकायदा बांधकामाची जबाबदारी आता कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांवर टाकली जाणार आहे. लोहगाव, विमाननगर भागात पाच ते सात मजली बेकायदा इमारतींवर महापालिकेने कारवाई करून त्या पाडून टाकल्या. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

‘या भागात बेकायदा इमारती उभ्या राहत असताना प्रशासनातील अधिकारी काय करत होते,’ असा प्रश्न विचारण्यात आला.‘यापुढील काळात बेकायदा बांधकामासाठी संबधित कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल,’ असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी पत्रकार परिषद घेतली. भिमाले म्हणाले, ‘खराडी, विमाननगर, लोहगाव परिसरातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. इतक्या उंच इमारती बेकायदा उभ्या राहत असतानाही अभियंत्यांचे दुर्लक्ष कसे झाले, अशी विचारणा या वेळी करण्यात आली.

हापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही याबाबत योग्य ती कार्यवाही करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असे सांगितले.’‘सहा ते सात मजली इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबधित विकसकाने त्याची विक्री केल्यानंतर महापालिकेकडून त्यावर कारवाई कशी केली जाते, बेकायदा बांधकामे सुरू असताना त्यावर कारवाई करून थांबविली का जात नाहीत,’ असे प्रश्न बैठकीत सदस्यांनी उपस्थित केले.बांधकामांचा पाया खोदतानाच बेकायदा बांधकामे थांबली पाहिजेत, अशी भूमिका सदस्यांनी मांडली.

हेही वाचा
Pune Mayor News : कमी वेळेत तक्रारी सोडविणाऱ्यांना मिळणार बक्षीस !
त्यावर ‘यापुढील काळात ज्या भागात अशा पद्धतीने बेकायदा बांधकामे होतील, त्यासाठी कनिष्ठ तसेच सहाय्यक अभियंत्यांना जबाबदार धरावे. याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी सूचना स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आल्याचे भिमाले यांनी सांगितले.

हेही वाचा : PMC … पुण्यातील २३ समाविष्ट गावांचा विकास करणार कोण?स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन एक पथक तयार करणार आहे. या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे.

अनधिकृत बांधकामांना काेणीही पाठीशी घालू नये, अशी भूमिका आहे. बेकायदा बांधकामे झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.

स्थायी समितीचे सदस्य आणि वडगाव शेरी, लोहगाव भागातील नगरसेवक सुहास टिंगरे यांनी भूमिका मांडताना सांगितले की, महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाचे फाेटाे काढले जातात. परंतु, नाेटीस काढू नये तसेच कारवाई होऊ नये, म्हणून या कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार केले जात आहेत. याची माहिती महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे.

संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यावर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!