Uncategorized
Trending

कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला

जुन्या वादातून तिघांनी केली मारहाण; सुरज काळे जखमी, आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मागंवर एका ऑटो रिक्षाचालकावर अज्ञात व्यक्तीनी कोथ्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, किती जणांनी हा हल्ला केला याची माहितीही समोर आलेली नाही. जखमी रिक्षाचालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, पुढील माहिती तपासानंतर समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!