Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
Uncategorized

पहाटे ६ वाजता शोज, १.२५ लाखांहून अधिक तिकिटं विकली; नोलनच्या ‘द ओडिसी’ची तुफान क्रेझ, ‘धुरंधर २’चाही रेकॉर्ड मोडणार?

(१७ जुलै २०२६)

ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द ओडिसी’ आज (१७ जुलै २०२६) जगभरात प्रदर्शित झाला आहे. भारतातही या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये पहाटे ६ वाजतापासूनच शोज सुरू झाले आहेत.
सॅकनिक्लच्या अहवालानुसार, फक्त ३४ आयमॅक्स स्क्रीनवरच ९१ हजाराहून अधिक तिकिटं विकली गेली असून त्यातून आधीच ९.५ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, शुक्रवारी एकट्या ओपनिंग डेसाठी १.२५ लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीच १० कोटींहून अधिक आणि अॅडव्हान्स बुकिंग मिळून २० कोटींवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२६ मध्ये आतापर्यंत फक्त ‘धुरंधर २’ (९० कोटी) आणि ‘बॉर्डर २’ (३२ कोटी) हेच चित्रपट पहिल्या दिवशी २० कोटींची नोंद करू शकले होते. नोलनच्या मागील ‘ओपनहायमर’ने भारतात १५० कोटींहून अधिक कमाई केली होती. आयमॅक्स फॉरमॅटला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळत असल्याने ‘द ओडिसी’ यंदाच्या मोठ्या ओपनिंग्समध्ये स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!