Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
Uncategorizedक्राईमपुणेपोलीसमहसूल विभागमहानगर पालिका व इतरमहाराष्ट्र
Trending

पुणे रिअल इस्टेट घोटाळा : फर्जी PMRDA आणि PMC मंजुरींवर २२ विक्री दस्त, १९ जणांवर गुन्हा दाखल; ७ बिल्डर्स समाविष्ट

  • पुणे : दत्तानगर, आंबेगाव येथील सब-रजिस्ट्रार कार्यालय (हवेली नं. २०) मध्ये एक मोठा रिअल इस्टेट घोटाळा उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपींनी PMRDA च्या फर्जी विकास परवानग्या (DP), कमेंसमेंट सर्टिफिक) फर्जी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) चा वापर करून २२ अवैध संपत्ती विक्री दस्त नोंदणी केल्याचे समोर आले आहे.PMRDA आणि PMC अधिकाऱ्यांनी सब-रजिस्ट्रार कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता सर्व मंजुरी फर्जी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये १९ व्यक्ती आणि ७ बिल्डर ग्रुप्सविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे.
  • तक्रारकर्ते : सब-रजिस्ट्रार रवींद्र कोळी
  • नोंदणीकृत कलमे :
  • भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५)
  • रजिस्ट्रेशन अॅक्ट १९०८ कलम ८२
  • आंबेगाव पोलिसांनी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांच्या साखळीची सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील कागदपत्र पडताळणी आणि पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
  • मुख्य मुद्दे :
  • १९ आरोपींमध्ये ७ बिल्डर कंपन्या
  • हवेली नं. २०, दत्तानगर, आंबेगाव येथे घटना
  • सब-रजिस्ट्रार रवींद्र कोळी यांची तक्रार
  • पुणे टक | PuneTak        रिअल इस्टेट क्षेत्रातील फसवणुकींवर सतत नजर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!