पुणेमहानगर पालिका व इतर
टिळकनगर येथील थ्री ज्वेल्स सोसायटी (कोलते पाटील) आणि हबटाउन (आकृती) सोसायटीतील नागरिकांना आनंदाची बातमी!

२५ जुलै २०२६: मागील काही वर्षांत या दोन्ही सोसायट्यांमध्ये अनेक नवे सभासद राहायला आल्याने लोकसंख्या वाढली आणि मिळणारे पाणी अपुरे पडू लागले होते. पुणे मनपा निवडणुकीच्या वेळी येथील नागरिकांनी तसेच सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पाण्याची समस्या कायमची सोडविण्याची विनंती केली होती.
-
त्यावेळी निवडणुकीनंतर दोन्ही सोसायट्यांसाठी
-
टिळक स्टील पॉइंटपासून कै. आनंत टिळक चौक पर्यंत (सुमारे २०० मीटर) थेट नवीन पाईपलाईन टाकणे आणि पुढे दोन्ही सोसायट्यांसाठी वेगवेगळ्या लाईन्स (सुमारे ३०० मीटर) टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
-
या कामासाठी मार्चच्या अर्थसंकल्पात खालील नगरसेवकांनी बजेट मंजूर करून घेतले:
-
नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळक
-
नगरसेविका वृषाली कामठे
-
नगरसेविका पूजा कदम
-
नगरसेविका अर्चना जगताप
-
आज या कामाची प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री. खुडे साहेब व श्री. रोमन साहेब तसेच माजी नगरसेवक श्री. अनिल येवले उपस्थित होते.
-
लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल.



