पुणे : २९ जून २०२६ च्या रात्री साडेअकराच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात तीन तरुणांना फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांनी अडवले. पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून कोर्टात नेण्याची धमकी दिली आणि २००० रुपये उकळले.
हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हडपसरच्या २४ वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल होताच दोघे पोलिस फरार झाले आहेत.
नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनीच नागरिकांना धमकावून पैसे उकळणे ही गंभीर बाब आहे.
पुणे तकची मागणी: दोन्ही पोलिसांना तात्काळ अटक करावी, निलंबित करावे आणि कडक कारवाई करावी. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी शेअर करा!
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!