क्राईमपुणेपोलीसमहाराष्ट्र
Trending

खंडणीखोर समीर शफी पठाण टोळीवर कोंढवा पोलीसांची मोक्का अंतर्गत मोठी कारवाई

पीडितांनी पुढे येण्याचे पोलीसांचे आवाहन

पुणे : कोंढवा पोलीस स्टेशनने बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या पठाण टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी शफी गुलजारखान पठाण (वय ६६) आणि समीर शफी पठाण (वय ३६) यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. इतर आरोपींचा शोध घेण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
कोंढवा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागणाऱ्या किंवा धमकी देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
प्रकरणाचा तपशील:
जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बांधकाम व्यावसायिक अकबर मेहबूब खान यांना बांधकाम बंद पाडण्याची भीती दाखवत आरोपींकडून मोठ्या रकमेची खंडणी आणि दोन बीएचके फ्लॅटची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात १५ लाख रुपये खंडणी वसूल करण्यात आली होती.
कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी हे संघटित गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोक्का लागू करण्यात आला.
कारवाईचे नेतृत्व:
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस (कोंढवा) आणि पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर कोळी, पोलीस अंमलदार नितीन चव्हाण, गिरीश एकोर्गे आणि सागर माने यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!