Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
क्राईममहानगर पालिका व इतरमहाराष्ट्र
Trending

मोशी दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित

पिंपरी-चिंचवड | १५ जुलै २०२६

मोशी कचरा डेपो येथील भीषण दुर्घटनेत ९ कंत्राटी कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता (अ गट) योगेश आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटना ८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपो व वेस्ट-टू-एनर्जी प्लांट येथे झाली होती. यात ९ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता.
आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, “सदर प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी केली जाईल. दोन्ही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी पुढील कारवाईचा मार्ग खुला झाला आहे.
Pune Tak News
सर्वांची लेखणी… जनतेचा आवाज!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!