क्राईमपुणेपोलीस
Trending

काळेपडळमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी; ३.७ लाखांच्या मुद्देमालासह दोन १९ वर्षीय तरुणांना अटक

पुणे (पुणे तक): हडपसरजवळील काळेपडळ परिसरातील इलेक्ट्रॉनिक दुकानांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या दोन १९ वर्षीय तरुणांच्या मुसक्या आवळण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले आहे.

संशयित आरोपींनी परिसरातील दुकानांमधून महागडे लॅपटॉप, स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, ब्लूटूथ स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केली होती. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये मूल्याची चोरीची मालमत्ता जप्त केली आहे.
​काळेपडळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी इतरही ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!